Pune Crime News : चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! निवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडले, 67 तोळे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पुणे शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहराच्या अनेक भागात चोरीच्या घटना घडत आहेत. आरोपींच्या मुस्क्या वनात पोलीस मात्र अपेक्षित ठरत आहे. पुण्यातील औंध परिसरातून (Pune Crime News)  हे चोरीचा एक असाच प्रकार उघडकीस आलाय. सिंचन विभागातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचा बंद फ्लॅट फोडून तबल 67 तोळे दागिने चोरट्याने चोरून नेले.  रात्रीच्या पावणे दोन तासात चोरट्यांनी 29 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 

 

याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अनोळखी 4 व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी 61 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

 

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंचन विभागातून उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते औंधमधील नागरस रोडवरील पिनाक गंगोत्री या इमारतीत राहतात. काही कामानिमित्त 7 जुलै रोजी कुटूंबासह ते गावी गेले होते. यादरम्यान, त्यांचा फ्लॅट बंद होता. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडी-कोंयडा उचकटून (Pune Crime News) आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील 67 तोळ्यांचे दागिने आणि लॅपटॉप असा तब्बल 29 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

 

 

20 जुलै रोजी पुण्यात परत आले. त्यावेळी त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलीसांना दिली. त्यानूसार, चतु:श्रृंगी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली. सोसायटीतील सीसीटीव्हीत चार चोरटे कैद झाले आहेत. त्यानूसार, त्यांचा शोध घेतला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.