Pune News : माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता परदेशी – राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांनी त्यांच्या ऑफिसच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

जयंत राजपूत यांचा पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावरील एका गल्लीमध्ये कार्यालय आहे. ते

पुण्यातील फार्मास्यूटिकल्स क्षेत्रातील व्यवसायिक होते. बुधवारी रात्री त्यांनी कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच समोर आले आहे.  आज सकाळी त्यांचा मुलगा कार्यालयांमध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलाय.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.