Talegaon : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

गोविंदा आनंदा जाधव (वय 64, रा. साईनगर, मामुर्डी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रतिभा विजय जाधव (वय 26, रा. म्हसोबा  चौकाजवळ, दत्तवाडी, पुणे) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गोविंद जाधव (वय 31) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिभा आणि मयत विजय हे पती पत्नी असून त्यांना एक मुलगा आहे. प्रतिभा ही विजय यांना वारंवार किरकोळ कारणावरून त्रास देत होती. खोट्या तक्रारी करून विजयला मुलाला भेटू देत नव्हती. यावरून विजय यांनी प्रतिभा सोबत घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. तरी देखील प्रतिभा-विजय यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होती. या त्रासाला कंटाळून विजय यांनी रविवारी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या केली. यावरून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.