Ajit Pawar : मी कधीच उद्धवजींचा माईक खेचला नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असलेला माईक ओढून घेणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार  (Ajit Pawar) यांनी जोरदार टोला लगावला आहे. अडीच वर्षात आम्ही कधीच माईक घेतला नाही. उद्धवजींचा माईक मी कधीच माझ्याकडे खेचून घेतला नाही. सुरुवातीलाच जर अशा प्रकारे ओढाओढी होत असेल तर हे महाराष्ट्र आणि पहावं असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. 

 

 

Pavana Dam: पवना धरण परिसरात  गेल्या चोवीस तासात 75 मिली मीटर पाऊस, धरणातील साठा 55.25 टक्क्यांवर

 

अजित पवार  (Ajit Pawar) यांनी यावेळी अनेक विषयावर भाष्य केले. राज्य सरकारने केलेली पेट्रोल डिझेलची दर कपात ही अतिशय तुटपुंजी असल्याचं ते म्हणाले. मी अर्थमंत्री असताना गॅसवरील कर 13.5  टक्के वरून तीन टक्क्यांवर आणण्यात आला. त्यामुळे सरकारी तुजरोवर 1000 कोटींचा भार पडला. आता सत्तेत असलेले त्यावेळी त्याला विरोध करत होते. सरकारने पेट्रोल डिझेलवरील करात 50 टक्के कपात करावी, अशी त्यांची मागणी होती. आता मात्र त्यांनी इंधनावरील कर 50 टक्केंपेक्षा कमी केला नाही याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले. पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती कमी झाल्या त्याने सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटमध्ये काहीही फरक पडणार नाही ,असेही ते म्हणाले.

 

 

 

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झाला नाही. याहून देखील अजित पवार  (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारचा चांगला समाचार घेतला. शिंदे आणि फडणवीस हे दोघेच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. या दोघांच्या खांद्यावर राज्याचा भार आहे. सरकारकडे 165 आमदारांचे पाठबळ असताना त्यांना भीती कसली वाटते. सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करायला का घाबरत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.