Pune Crime News : पुण्यात अवघ्या सात मिनिटात घरफोडी, 11 तोळे सोन्याचे दागिने लांबवले

एमपीसी न्यूज – भाचीला शाळेतून आणण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्यानंतर अवघ्या सात मिनिटात घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात ही घटना घडली. अवघ्या सात मिनिटात चोरट्याने (Pune Crime News)  तीन लाख 52 हजार रुपयांचे 11 तोळे सोने चोरून नेले. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

 

Pune Crime News : आधी बलात्कार आणि नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीची 34 लाखांची फसवणूक

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा आंबेगाव पठार परिसरात आई – वडील आणि भावासह राहतो. एका महाविद्यालयात तो शिक्षण घेतोय. दरम्यान वडील त्याचे मार्केट यार्डमध्ये काम करतात तर भाऊ देखील एका क्लासला जातो. देव दर्शनाला गेल्याने आई देखील घरी नव्हती. बुधवारी दुपारी तो भाचीला शाळेतून आणण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडला होता. त्यानंतर अवघ्या सात मिनिटात  (Pune Crime News) तो परत आला. त्यावेळी त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने घरात जाऊन पाहणी केली असता किचनमधील कपाटाचे लॉकर तोडले होते. त्यातील 11 तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.