Pune Crime News : आधी बलात्कार आणि नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीची 34 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बलात्काराचा एक प्रकार उघडकीस आलाय. एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. आणि शरीर संबंधाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीची तब्बल 34 लाख रुपयांनी फसवणूक (Pune Crime News) करण्यात आली. पुलगेट परिसरात राहणाऱ्या एका 33 वर्षे तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोहेल अजीम सय्यद (वय 32) आणि त्याच्या चार नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2017 ते 2019 या कालावधीत घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी सोहेल यांची ओळख होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला घरी घेऊन जात कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध (Pune Crime News) दिले. फिर्यादी बेशुद्ध झाल्या असता आरोपीने त्यांचे कपडे काढून त्यांच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. या संपूर्ण प्रकाराचा त्याने व्हिडिओ देखील काढला होता. त्यानंतर हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी या तरुणीकडून पैसे उकळले.

 

 

आरोपीने फिर्यादी सोबत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले आणि फिर्यादी यांचा फ्लॅट विकून, फिर्यादीकडे असलेले पैसे असे एकूण 33 लाख 92 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.