Pune : किमान वेतन मिळाल्यास महापालिकेत डॉक्टरांची भरती होणार

महापालिकेला तातडीने हवे आहेत 200 डॉक्टर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात शेकडो डॉक्टरांच्या जागा खाली आहेत. त्यांना किमान वेतन मिळाल्यास या जागा भरती होऊ शकतात, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

जवळपास 200 डॉक्टर महापालिकेला तातडीने हवे आहेत. दरवर्षी 5 हजार डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देतात. अशाच प्रकारची सेवा शहरी भागातही हवी. सध्या या डॉक्टरांना 52 हजार, 6 व्या वेतन आयोगानुसार 72 हजार तर, 7 व्या वेतन आयोगानुसार आणखी मानधनात वाढ होणार आहे.

किमान समान काम, किमान वेतनाची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. महापालिकेच्या रुग्णालयात अनेक गोरगरीब नागरिक उपचार घेत असतात. आरोग्य क्षेत्र प्रचंड महाग झाले आहे. या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.