Pune railway : पुणे रेल्वे विभागाकडून डब्यांची एअर स्प्रिंग बदलण्याचे इन-हाउस तंत्र विकसित

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागाकडून डब्यांची एअर स्प्रिंग बदलण्याचे इन-हाउस तंत्र विकसित केले आहे. मध्य रेल्वे वर हे तंत्र विकसित करणारा पुणे विभाग हा पहिला विभाग ठरला आहे.(Pune railway) यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना 45 ते 60 मीटर बदलता येते व जास्त विलंब न होता गाडी आपल्या गंतव्यस्थानी रवाना केली जाते. त्यामुळे गाड्या वेळेवर धाऊ शकतात व प्रवाशांना त्रास कमी होतो.

मेल एक्स्प्रेस पॅसेंजर गाड्यांच्या एलएचबी डब्यांमध्ये उत्तम प्रवासाच्या अनुभवासाठी, सेकेंडरी सस्पेंशन मध्ये एअर स्प्रिंग्स वापरल्या जातात. प्रवासी गाड्यांच्या नियमित प्राइमरी मेंटेनेंस दरम्यान, चाचणी आणि परीक्षण करुनच त्यांना सेवेत पाठवले जाते. एलएचबी कोचमधील सेकेंडरी सस्पेंशन एअर स्प्रिंगचे फेलुअर होण्याच्या केस ज्याचे प्रमाण खूप कमी आहे. तरीही कधी कुठली एयर स्प्रिंग निकामी झाली त्याच्यासाठी पुणे विभागाच्या यांत्रिक विभागाने या दिशेने एक पाऊल टाकत इन-हाउस तंत्र विकसित केले आहे, यामुळे जेव्हा सेक्शनमधील प्रवासी गाडीच्या एलएचबी कोचचे सेकेंडरी एअर स्प्रिंग्स निकामी होते तेव्हा डब्याला गाडी पासून वेगळे न करता कर्मचाऱ्यांना कडून अटेंड करून विशेष उपकरणाच्या साहाय्याने 45 ते 60 मिनिटांत एअर स्प्रिंग बदलली जाते आणि जास्त विलंब न होता गाडी आपल्या गंतव्यस्थानी रवाना केली जाते जे पंक्चुअलिटी राखण्यात खूप मदत होते.

जेव्हा एखादी एअर स्प्रिंग फेल होते, तेव्हा डब्यात बसवलेले फेलुअर होण्याच्या केस इंडिकेशन डिवाइस सक्रिय होऊन एका विशिष्ट ध्वनि द्वारे चेतावणी देते.(Pune railway) यामुळे गाडीच्या लोको पायलट आणि गार्ड यांना तात्काळ कळते की ट्रेनच्या कुठल्या तरी डब्याची एअर स्प्रिंग फेल झाली आहे. या स्थितीत सेफ्टी सूचनांचे पालन करून गाडी विशिष्ट नियंत्रित वेगाने चालवावी लागते त्यामुळे प्रभावित गाडीच्या तसेच सेक्शन मधील इतर गाड्यांच्या पंक्चुअलिटीवर परिणाम होऊ शकतो.

Girish Mahajan : उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे – गिरीश महाजन

या समस्येवर मात करण्यासाठी आणि प्रवाशी सुविधा अधिक चांगल्या, सुरक्षित करण्यासाठी, मध्य रेल्वे वर हे तंत्र विकसित करणारा पुणे विभाग हा पहिला विभाग ठरला आहे.(Pune railway) अलीकडेच एका प्रवाशी गाडीच्या डब्यात एअर स्प्रिंगची अशी समस्या निर्माण झाली होती ती अटेंड करून 45 मिनिटांत स्प्रिंग बदलण्यात आली. सध्या गाडी दुरुस्तीची ही सुविधा पुणे आणि मिरज स्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा आणि मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिक इंजीनियर ए. के. गुप्ता, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिह यांनी वरिष्ठ विभागीय यांत्रिक इंजीनियर विजयसिंह दडस यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील यांत्रिक विभागाच्या टीमचे एलएचबी डब्यांच्या दुरुस्तीसाठी इन-हाऊस तंत्र विकसित केल्याबद्दल अभिनंदन केले आहे आणि भविष्यातही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील रहावे यासाठी प्रेरित केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.