Pune News : पुण्यात प्रसूती रजेवर असलेल्या महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पूजा कांबळे (वय 27) असे या आत्महत्या केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पूजा कांबळे या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. मागील आठ महिन्यापासून त्या प्रसूती रजेवर होत्या. धनकवडी येथे पतीसोबत त्या राहत होत्या. दरम्यान रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

खोलीचा दरवाजा न उघडल्याने पतीने दार वाजवले. तरीही त्या दार उघडत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला व आत पाहिले. त्यांना पूजा यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.