Petrol-Diesel Rate : पुण्यात पेट्रोल 105.96 रुपये लिटर तर डिझेल 92.48 रुपये लिटर

एमपीसी न्यूज – राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेलवरील वॅटमध्ये कपात केल्याने आज (शुक्रवार) आजपासून पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी (Petrol-Diesel Rate)  झाले आहेत. पुण्यातील पेट्रोलचा आजचा दर 105.96 रुपये तर डिझेलचा दर 92.48 रुपये आला आहे.

 

पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारला भाजपने सूचना केली होती.मात्र राज्य सरकारने त्याला नकार दिला होता. आता राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार आल्यावर त्यांनी हा महत्वपुर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. केंद्राने  एक्साइज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी भाजपकडून होत होती. पे़ट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दर कमी केल्यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

 

 

 निगडी प्राधिकरण येथील मोरया पेट्रोलियम येथे आज सकाळी सहापासून पेट्रोल व डिझेलचे दर पुढील प्रमाणे आहेत.

 पेट्रोल – 105.96 रु  प्रती लिटर
 डिझेल – 92.48  रु प्रती लिटर
 पॉवर पेट्रोल – 111.85 रु प्रती लिटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.