Crime News : एटीएममध्ये चोरी करत मशीन जाळण्याचा प्रयत्न;तळेगाव दाभाडे येथील प्रकार

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे येथे चोरट्यांनी केवळ पैसे चोरले नाहीत तर चोरीनंतर एटीएम मशीन जाळून (Crime News) टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा प्रकार गुरुवारी (दि.14) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला.

 

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

 

 

तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकातील एचडीएफसी बँकेचे एटीएममध्ये (Crime News) हा प्रकार घडला आहे.यावेळी चोरट्याने एकूण 5 लाख 82 हजार 500 रुपये चोरून नेले आहेत. यावरून अज्ञात इसमावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधीत व्यक्ती ही जाणकार असून त्याने प्रथम पासवर्ड टाकून मशीन उघडले आहे.पुढे पुरावा नष्ट करण्यासाठी व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मशीन पेटवून दिले.

 

Petrol-Diesel Rate : पुण्यात पेट्रोल 105.96 रुपये लिटर तर डिझेल 92.48 रुपये लिटर

 

 

पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असून पोलीस परीसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.यावेळी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व बँकांनी त्यांच्या एटीएम मशीन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व एक सुरक्षा रक्षक ही नेमावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.