Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – राज्यात गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र आता पुढील तीन चार दिवसांत पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

राज्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दक्षिणेकडे असलेला मान्सूनचा आस, राज्याच्या मध्यभागावर पुर्व-पश्चिम दिशेने वाहणारे परस्पर विरोधी वारे यांचे जोड क्षेत्र या प्रणाली सक्रिय आहेत. तसेच अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्यामुळे राज्यात जोरदार पाऊस पडत होता. त्यातच आता मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून पुर्व किनार्यालगत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र ओसरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील तीन चार दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर ( Rain Alert) ओसरण्याची शक्यता आहे.

 

 

Britain’s PM Race : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर

 

उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली.गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत घाटमाथ्यावरील शिरगाव येथे सर्वाधिक 312 मिमी. पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पूर्व विदर्भातही पावसाच्या दमदार सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर,नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.