Pune News : रुपीनगर येथे चिमुकल्यांसह ज्येष्ठही गणरायाची मुर्ती साकारण्यात दंग

 एमपीसी न्यूज – रुपीनगर येथे निसर्गराजा मित्र जीवांचे या संस्थेतर्फे शाडूच्या गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळा रविवारी (दि.28) पार पडली. यामध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून ते 48 वर्षीय नागरिकांनीही हिरीरीने सहभाग घेतला होता.

कात्रज येथील कला शिक्षिका विजया वेल्हाळ यांनी याकरिता सर्वांना मार्गदर्शन केले. वेल्हाळ या गेली अनेक वर्षे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेत असतात. आपले सर्वच सण हे पर्यावरणाशी निगडित असतात, आपणही सर्व सण पर्यावरण पूरक साजरे करावे यासाठी निसर्गराजा संस्था नेहमीच आग्रही असते.शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे शिबीर भरविण्याची संस्थेची ही पहिलीच वेळ होती. याबरोबरच पर्यावरण पूरक सजावट करण्याविषयी राज्य स्थरिय स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे.

या कार्यशाळेत एकूण 48 जणांनी सहभाग घेतला होता.सर्वांनी विविध आकाराच्या गणेश मूर्ती बनविल्या तसेच चतुर्थी दिवशी याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेसाठी दत्त सेवा प्रतिष्ठान रुपीनगर यांच्यातर्फे मंदिरातील जागा उपलब्ध करून दिली तसेच श्रियाल साळुंखे, अमरदीप बाबरदेसाई, अतुल वाघ , शिंप्ली रंध्ये , अश्विनी धर्माधिकारी, रमेश कदम यांनी कार्यशाळेचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.