Share Market : शेअर बाजारात घसरण

एमपीसी न्यूज – भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या पडझडीने झाली आहे.बाजारातील व्यवहार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1000 अंकांनी घसरला. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरु असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला.एसजीएक्स निफ्टी 300 अंकांची घसरण झाली.

शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात शेवटच्या काही तासांत मोठी घसरण झाली होती. महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले होते. त्यानंतर बाजार बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासांत अमेरिकन शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसला. त्यामुळे अमेरिकेत मोठी घसरण दिसून आली. त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची दाट शक्यता होती.

प्री- ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये 1200 अंकांनी घसरण झाली तर निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण दिसून आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास सेन्सेक्स 1069 अंकांच्या घसरणीसह 57 हजार 753.61 अंकांवर व्यवहार करीत होता. तर निफ्टी 314  अंकांच्या घसरणीसह 17 हजार 244.45 अंकांवर व्यवहार करत होता.

निफ्टी आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक, रियल्टी या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. आयटी निर्देशांकात 4.20 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर पीएसयू बॅंक निर्देशांकात 2.51 टक्के मेटलमध्ये 2.44 टक्के घसरण दिसून आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.