Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते PMPMLच्या चार नवीन बस मार्गांचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पीएमपीएमएलच्या चार नवीन बस मार्गांचे लोकार्पण आज (रविवारी) लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पुण्याचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक प्रशांत जगताप, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, स्वारगेट आगार व्यवस्थापक राजेश कुदळे, हडपसर आगार व्यवस्थापक सुभाष गायकवाड, सहाय्यक आगार व्यवस्थापक मोहन दडस आदी मान्यवर उपस्थिती होते.

मार्ग क्रमांक 170 – पुणे स्टेशन ते कोंढवा कौसरबाग,

मार्ग क्रमांक 178 – स्वारगेट ते एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी

मार्ग क्रमांक 181 – न.ता.वाडी ते आझादनगर वानवडी

मार्ग क्रमांक 289 – हडपसर ते सिध्दार्थनगर साळुंके विहार असे चार नवीन बस मार्ग पीएमपीएमएल कडून आज सुरू करण्यात आले. सध्या या चारही मार्गांवर प्रत्येकी एक बस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस वाढविल्या जाणार आहेत.

मार्ग क्रमांक 170 – पुणे स्टेशन ते कोंढवा कौसरबाग या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, वानवडी, लुल्लानगर, दत्त मंदिर, कौसरबाग असा आहे.

मार्ग क्रमांक 178 – स्वारगेट ते एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी या बससेवेचा मार्ग स्वारगेट, पुलगेट, फातिमानगर, जगताप चौक, एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी असा आहे.

मार्ग क्रमांक 181 – न.ता.वाडी ते आझादनगर वानवडी या बससेवेचा मार्ग न.ता.वाडी, मनपा, अपोलो टॉकीज, नानापेठ, भवानीपेठ, पुलगेट, वानवडी कॉर्नर, जगताप चौक, साळुंके विहार, आझादनगर वानवडी असा आहे.

मार्ग क्रमांक 289 – हडपसर ते सिध्दार्थनगर साळुंके विहार या बससेवेचा मार्ग हडपसर, फातिमानगर, जांभूळकर चौक, जगताप चौक, सिद्धार्थनगर साळुंके विहार असा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.