Talegaon : महाराष्ट्र मजदूर संघटना आयोजित कामगार मेळाव्याचे नगराध्यक्षा जगनाडे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – जिजामाता चौक येथे महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेमार्फत आज 31 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भव्य कामगार मेळावा आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, नगरसेविका वैशाली दाभाडे, अॅड. राजेंद्र पोळ, सुदाम दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कष्टकरी कामगारांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली, असे संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक अरुण माने यांनी सांगितले. कामगारांच्या अडचणीचे निराकरण करणे व विविध योजनांचा गोरगरिबांना फायदा मिळवून देण्यासाठी संघटना काम करेल, असे गणेश भेगडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन किशोर कवडे, संतोष परदेशी, अनंत काकडे, चंदू लहाणे, राजेश चव्हाण, राजू जव्हेरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष किरण साळवे यांनी मानले. त्यावेळेस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पीएसआय गाडीलकर साहेब व पी एस आय गावडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. वाबळे साहेब व इतर कर्मचारी यांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पोलीस हत्ते साहेब व रावण साहेब यांनी वाहतूक नियंत्रित करण्याचे चोख काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.