Pune News : सर्वस्पर्शी फाउंडेशनच्या तीन शाखांचा उदघाट्न

एमपीसी न्यूज – सर्वस्पर्शी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, पुणे या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि खेड जुन्नर आंबेगाव या तीन शाखांचे उद्घाटन नुकतेच झाले.

हा कार्यक्रम केंद्रीय विद्यालय संगठन, मुंबई संभाग येथील माजी सहाय्यक आयुक्त एस. पी. पाटील, महाराष्ट्र गोवा नोटरीज असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य कांचन निगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस मीना भोसले,आणि राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे माजी विभागीय उपयुक्त कि. स.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी सर्वस्पर्शी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजू पोखर्णीकर यांनी प्रास्ताविक व अध्यक्षीय मनोगतातून संस्थेच्या कार्याचा व वार्षिक उपक्रमांचा आढावा घेतला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय सर्वस्पर्शी फाउंडेशनचे सचिव डॉ. महादेव रोकडे व महिला कार्याध्यक्षा अॅड. पुनम स्वामी-प्रधान यांनी केला. यावेळी आदर्श शिक्षिका अनामिका काळे यांना सेवानिवृत्त सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त किसन पवार, मुंबई मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य, पर्यटन कला व सांस्कृतिक महोत्सव समितीचे समन्वयक आणि पालघर युनिटच्या सर्वस्पर्शी फाऊंडेशनचे सदस्य डॉ. चंदन जोगे, सर्वस्पर्शी फाऊंडेशनच्या पुणे शहर युनिटच्या अध्यक्षा सौ. मीना भोसले, पिंपरी-चिंचवड युनिटचे अध्यक्ष सचिन थोरात, खेड-जुन्नर-आंबेगाव युनिटच्या अध्यक्षा अश्विनी टेमकर, सर्वस्पर्शी फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट आशुतोष रानडे आणि प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

खडकी कोर्टच्या अॅड. स्नेहलता ठाकूर, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाग अध्यक्षा संजीवनी पुराणिक, सिंबोयसिस कॉलेज येथील संतोष कदम, सर्वस्पर्शी फाऊंडेशनच्या राज्य महिला संघटक राजश्री पोटे, जनसंपर्क अधिकारी अनिल मोहळ, खजिनदार सागर पोखर्णीकर, सदस्या मधुरा पंडित, सर्वस्पर्शी फाऊंडेशनचे सदस्य व दापोडी येथील केंद्रीय विद्यालय, सीएमईचे उपप्राचार्य रंजन इंगळे, मोशी येथील राजेश हातेकर, अश्विनी जाधव, धनंजय पोटे, अमोल दुराफे, संगीता मळेकर, पौर्णिमा देशमुख, राहूल ससाणे, अश्विनी जाधव, तसेच पिंपरी-चिंचवड युनिटचे कार्याध्यक्ष विशाल प्रधान, तसेच सर्वस्पर्शी फाऊंडेशनच्या तीनही कार्यकारिणीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

फाऊंडेशनचे उपाध्यक्ष एफ. डी. देवरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सहसचिव आणि नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्रा. डॉ. समिंदर घोक्षे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.