Indapur : गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकी विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर; कारवाई न झाल्यास इंदापूर बंदची हाक

एमपीसी न्यूज : इंदापूर (Indapur) येथे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या चप्पल फेक करण्यात आली. या घटनेने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला असून रस्ता रोको करण्यात आलेला आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास उद्या रविवार 10 डिसेंबर रोजी इंदापूर बंद ठेवण्याची हाक आंदोलकांकडून पुकारण्यात आली आहे. 

Chinchwad : मोठी बातमी! देवगड येथे सहलीसाठी गेलेले पिंपरी-चिंचवड येथील पाच विद्यार्थी बुडाले; चार मुलींचा मृत्यू तर एकजण बेपत्ता

आज इंदापूर येथे ओबीसी समाजासाठी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा पूर्ण करून पडळकर दूध आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर एकाने चप्पलफेक केली. परंतु, हि चप्पलफेक  आम्ही केली नसून त्यांच्याच लोकांनी केल्याचे मराठा समाजाने सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.