Chinchwad : मोठी बातमी! देवगड येथे सहलीसाठी गेलेले पिंपरी-चिंचवड येथील पाच विद्यार्थी बुडाले; चार मुलींचा मृत्यू तर एकजण बेपत्ता

एमपीसी न्यूज – कोकणातील देवगड पिंपरी चिंचवड (Chinchwad) येथील फिरायला गेलेले 5 विद्यार्थी बुडाले असून यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण अजूनही बेपत्ता आहे. हि घटना आज (शनिवारी) सांयकाळी घडली. संकल्प सैनिक स्कूल अकॅडमी, रुपीनगर निगडी येथील सहल देवगड येथे गेली होती. ज्यामध्ये 35 जणांचा समावेश होता.

बुडालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 4 मुलींचा समावेश आहे. मृतांमध्ये अंकिता गालटे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे आणि पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे. दरम्यान, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

हे पाच जण समुद्रात अंघोळीसाठी गेले असताना ते बुडाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.