India : फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार 5 वर्षाचा वर्क व्हिसा

एमपीसी न्यूज – फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण (Masters Degree) घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आता अभ्यासानंतरचा पाच वर्षांचा दीर्घकालीन व्हिसा दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि .13) केली. या आधी भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर फक्त 2 च वर्षांचा वर्क व्हिसा मिळायचा. पॅरिसमधील एलए सीन म्युझिकेल येथे लोकांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली. तेथे जमलेल्या लोकांकडूनही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Pune : बेकायदेशीर संपत्ती जमवल्या प्रकरणी तत्कालीन उपायुक्त नितीन ढगे व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

नरेंद्र मोदी म्हणाले, ” गेल्या वेळी मी फ्रान्समध्ये आलो तेव्हा फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 2 वर्षांचा अभ्यासानंतरचा वर्क व्हिसा दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता.

आता फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 5 वर्षांचा दीर्घकालीन व्हिसा देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.”

दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर गुरुवारी पॅरिसमध्ये आलेल्या पंतप्रधानांचे फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी विमानतळावर  स्वागत केले.

फ्रान्स आपला राष्ट्रीय दिन साजरा करत असल्याने पंतप्रधान मोदींनी त्यांच्या फ्रान्स दौऱ्याला “स्पेशल” असे  म्हटले आणि त्यानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या.

त्यापुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “फ्रान्समध्ये भारताच्या यूपीआयच्या वापरासाठी करार करण्यात आला आहे.

त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून केली जाईल आणि आता भारतीय पर्यटक आयफेल टॉवरच्या परिसरात यूपीआयच्या माध्यमातून रुपयात पेमेंट करू शकतील.

भारत आणि फ्रान्स दीर्घकाळापासून पुरातत्व मोहिमेवर काम करत आहेत.  डिजिटल पायाभूत सुविधा हे भारत आणि फ्रान्समधील संबंध मजबूत करणारे आणखी एक क्षेत्र आहे.”

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ही भेट भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्तही आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.