PCMC : पिंपरी, आकुर्डीतील पंतप्रधान आवास योजनेला प्रतिसाद; 9 हजार अर्ज 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी (PCMC) आकुर्डी व उद्यमनगर, पिंपरी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. येथील 938 सदनिकांसाठी 9 हजार 128 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 452 जणांनी 10 हजार 500 रूपये शुल्क भरले आहे.

India : फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार 5 वर्षाचा वर्क व्हिसा

आकुर्डी येथील गृहप्रकल्पात एकूण 568 सदनिका आहेत.

तर, उद्यमनगर येथील गृहप्रकल्पात एकूण 370 सदनिका आहेत.

हे दोन्ही गृहप्रकल्प तयार आहेत. सदनिकेसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) व दिव्यांग असे आरक्षण आहे.

आकुर्डीतील सदनिकेसाठी 7 लाख 35 हजार 255 रूपये आणि पिंपरीतील सदनिकेसाठी 7 लाख 92 हजार 699 रूपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे.

त्यासाठी नागरिकांकडून 28 जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

आतापर्यंत 13 दिवसांत एकूण 9 हजार 128 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी 452 अर्जदारांनी 10 हजार रूपये अनामत रक्कम व 500 रूपये नोंदणी शुल्क ऑनलाइन जमा केले आहे. अर्ज 28 जुलैपर्यंत ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत.

त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच, अर्जदार व त्यांच्या कुटुंबांच्या नावाने देशात घर नसावे. तो शहराचा रहिवाशी असावा, अशा अटी (PCMC) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.