Pune : बेकायदेशीर संपत्ती जमवल्या प्रकरणी तत्कालीन उपायुक्त नितीन ढगे व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  तत्कालीन पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे व त्यांच्या पत्नी ( Pune ) विरोधात बेकायदेशीर संपत्ती जमा केल्याप्रकरणी तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

नितीन ढगे व त्यांच्या पत्नी प्रतिभा ढगे यांनी भ्रष्ट मार्गाने सुमारे 1 कोटी 29 लाखांची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने ही कारवाई केली आहे.

पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एसीबी’ने 2021 मध्ये नितीन ढगे यांच्यावर सापळा रचून कारवाई केली होती.

त्यावरून वानवडी पोलिस ठाण्यात 16 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा दाखल केला होता.

Pune : गंभीर वैद्यकीय आजार असलेल्या व्यक्तींसाठी ‘आत्मन’ या उपक्रमाद्वारे विवाह जुळवणी व समुपदेशन

त्यानंतर ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी ढगे यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात 1 कोटी 28 लाख 49 हजार रूपये आढळून आले होते.

त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली.

या चौकशीत नितीन ढगे यांनी 2006 ते 2021 या कलावधीत 1 कोटी 28 लाख 95 हजार 150 रूपये (ज्ञात उत्पन्नापेक्षा 47 टक्के जास्त) इतकी मालमत्ता भ्रष्ट मार्गाने मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच, प्रतिभा ढगे त्यांना  प्रोत्साहन दिले, कागदपत्रांमध्ये खोटी माहिती भरून सरकारची फसवणूक केली.

याबाबत ‘एसीबी’च्या पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी तक्रार दिली. त्यावरून नितीन ढगे आणि प्रतिभा ढगे यांच्याविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत ( Pune ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.