Pune : पुण्यात येण्या-जाण्याच्या हवाई मार्गांमध्ये इंडिगोद्वारे वाढ

एमपीसी न्यूज – इंडिगो कंपनी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान (Pune) या सुवर्ण त्रिकोणामध्ये गतिशीलता, सुलभता आणि आंतरराज्यीय कनेक्शन सुधारण्यासाठी अतिरिक्त मार्ग सुरु करणार आहे. गुरुवारी (दि. 7) इंडिगोने पुण्याला जाण्या-येण्यासाठी जोधपूर, राजकोट आणि वडोदरा असे तीन नवीन मार्ग सुरू करण्याची घोषणा केली.

इंडिगो कंपनी प्रमाणे 16 जूनपासून पुणे आणि जोधपूर तर 3 जुलै पासून पुणे-राजकोट आणि पुणे-वडोदरा दरम्यान ऑपरेशन सुरू झाले आहेत.

याबाबत बोलताना इंडिगोचे ग्लोबल सेल्स हेड विनय मल्होत्रा म्हणाले, “या नवीन मार्गांमुळे केवळ आंतरराज्यीय गतिशीलता आणि कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार नाही. तर देशाच्या सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक वाढीसही हातभार लागेल.

आम्ही देशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवत राहू. आणि आमच्या व्यापक नेटवर्कवर परवडणारा, बरोबर वेळेवर होणार, विनम्र आणि त्रास-मुक्त प्रवासाचा अनुभव प्रदान करण्याची आमची वचनबद्धता कायम ठेवू.”

पुण्याहून जोधपूर आणि वडोदराला जाणारी (Pune) व परत येणारी जाणारी विमाने बुधवार आणि शनिवार वगळता दररोज चालणार आहेत. तर पुण्याहून राजकोटला जाणारी व परतणारी विमाने शनिवार वगळता दररोज सुरू असतील.

Alandi : कडूस गोहत्या निषेधार्थ आळंदीकरांचा मूक मोर्चा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.