Talegaon Dabhade : इंद्रायणीच्या ‘सचिन’ने सार्थ केला ‘विश्वास’!

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि (Talegaon Dabhade) मावळातील सडवली गावतील सचिन विश्वास गायकवाड हा होतकरू युवक नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादित करून  पोलीस उपनिरीक्षक (PSI) झाला आहे. 

शेतकरी कुटुंबातील जन्म, पाचवीला पूजलेले कष्ट, परिस्थितीशी दोन हात करत जगण्यासाठीचा संघर्ष, शिक्षणाची आस आणि ओढ मात्र इतकी की, नियतीलाही सचिनच्या कष्टांपुढे झुकावेच लागले.

सचिन गायकवाड यांने आपले महाविद्यालयीन शिक्षण इंद्रायणी महाविद्यालयातील कला शाखेतून पूर्ण केले. तळेगावला येणे- जाणे परवडणारे नसल्याने त्याने अर्थार्जनासाठी सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करली. जगण्याचा हा संघर्ष सुरू असताना त्याने जिद्दीने MPSC चा अभ्यास सुरू ठेवला.

2017 साली  एका गुणांने त्याच्या स्वप्नांना हुलकावणी दिल्यानंतर त्याने अधिक जोमाने अभ्यास करत यावेळेस मात्र यश संपादित केले.

या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, (Talegaon Dabhade) कार्यवाहक चंद्रकांत शेटे, प्राचार्य संभाजी मलघे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सचिनला मार्गदर्शन करणारे आर आर डोके सर आदींनी अभिनंदन केले.

Pune : पुण्यात येण्या-जाण्याच्या हवाई मार्गांमध्ये इंडिगोद्वारे वाढ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.