Akurdi News : डॉ. डी. वाय पाटील शैक्षणिक संकुल येथे  “इंडस्ट्री ॲकॅडेमिया कॉन्क्लेव्ह” संपन्न 

एमपीसी न्यूज –  आकुर्डी येथील “डॉ. डी. वाय पाटील (Akurdi News) शैक्षणिक संकुल आणि “नैसकॉम फ्युचर स्कील्स प्राइम” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “इंडस्ट्री ॲकॅडेमिया कॉन्क्लेव्ह – 23 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सोल्यूशन इंजिनिअरिंगच्या सेल्सफोर्सचे उपाध्यक्ष दीपक पारगावकर हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते.  विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कौशल्ये विकसित करण्यासाठी उद्योगाची आवश्यकता ओळखणे आणि एकूण रोजगार क्षमता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

महाराष्ट्र राज्यातून सुमारे 300 प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, सदस्य, प्रशिक्षक आणि प्लेसमेंट अधिकारी आणि 250 हून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. (Akurdi News) तसेच डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डीचे संचालक रियर ऍडमिरल (नि) अमित विक्रम, डीवायपीआययू – आकुर्डीचे कुलगुरू प्रा प्रभात रंजन, संकुलाच्या प्लेसमेंट विभागाच्या अधिष्ठाता जस्मिता कौर संकुलातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आदी  उपस्थित होते .

Chinchwad Crime : चिंचवडमध्ये दोन घरफोडीत 5 लाखांचा ऐवज चोरीला

यावेळी नेसकॉम फ्युचर ऑफ वर्क इन स्ट्रॅटेजी चे मुख्य सल्लागार प्रमोद इडिकुल्ला, नैसकॉमच्या संशोधन विभागाच्या उपसंचालक निर्मला बालकृष्णन, एसएससी नैसकॉम चे उपसंचालक श्रीदेवी सिरा, नैसकॉमच्या कम्युनिकेशन अँड इनसाइट्स चे लीड, कामना जैन, एसएससी नैसकॉम चे प्रादेशिक लीड सचिन म्हस्के आदी मान्यवर  उपस्थित होते.

त्यांनी डिजिटल कौशल्याच्या माध्यमातून मानवी भांडवलाचे रूपांतर करण्याविषयीची माहिती दिली.  सेक्टर स्किल कौन्सिल , नैसकॉम ने “स्टेट ऑफ डाटा सायन्स अँड एआय इन इंडिया – डाटा अँड द आर्ट ऑफ स्मार्ट इंटेलिजन्स” हा वार्षिक अहवाल सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती सेठ यांनी केले. (Akurdi News) या कार्यक्रम आयोजनासाठी आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष  सतेज पाटील आणि विश्वस्त  तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.