Moreshwar Bhondve : माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना शिवीगाळ

एमपीसी न्यूज – नगरसेवक मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve) यांना दोघांनी शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी (दि. 1) मध्यरात्री दीडच्या सुमारास रावेत येथे घडली.

मोरेश्वर भोंडवे यांनी याप्रकरणी रावेत चौकीत तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन आज्ञातांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Todays Horoscope 03 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक भोंडवे (Moreshwar Bhondve)  यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्री मंडप टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी भोंडवे आणि त्यांचे मित्र घराच्या अंगणात बसले होते. दरम्यान, रात्री दीडच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तसेच, भोंडवे यांचे नाव घेऊन अपशब्द वापरले. त्यावेळी भोंडवे बाहेर आले असता आरोपींनी धूम ठोकली. यापूर्वी देखील भोंडवे यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र देण्यात आले होते. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.