Pune : क्रेनचे लोखंडी चॅनल डोक्यात पडून मजुराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे स्टेशन येथील बांधकाम साईटवर काम सुरू असताना क्रेनचे लोखंडी चॅनल मजुराच्या डोक्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोपी शर्मा (वय 34, ब्रम्हा पुणे स्टेशन) यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार ठेकेदार, सेफ्टी सुपरवायझर, इंजिनिअर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रवणकुमार दार (वय 32), असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन येथे बुलेवार्ड कन्स्ट्रक्शन साईटचे काम सुरु आहे. यावेळी ठेकेदार, सुपरवायझर आणि इंजिनिअर यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धोकादायकरित्या क्रेनमधील लोखंडी चॅनल उतरविताना लोखंडी चॅनेल चवथ्या मजल्यावर काम करणारे मजूर कामगार श्रवणकुमार यांच्या डोक्यात पडली. त्यात गंभीर जखमी झाल्याने श्रवणकुमार याचा मृत्यू झाला. बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.