Pune : नगरसेवकांची सीबीआय सीआयडी चौकशी करा, असे म्हणणे बरोबर नाही – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज – माजी महापौर प्रशांत जगताप यांनी नगरसेवकांची सीबीआय व सीआयडी चौकशी करा, असे म्हटले ते बरोबर नाही, असे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले. या खात्यांना वाटेल तेव्हा चौकशी होणारच आहे. त्यांच्या भाषणाच्या शब्दांत मी महापौर, मी नगरसेवक असा उल्लेख वारंवार आला, असेही शिंदे म्हणाले.

अरविंद शिंदे म्हणाले, स्थायी समिती अध्यक्षांप्रमाणेच आयुक्तांनीही बजेट फुगविले. बजेटमध्ये तूट येत असताना फुगीर बजेट कशासाठी, वस्तुनिष्ठ बजेट का मांडले नाही, आयटीला किती सवलत देणार, 100 -100 कोटी खर्च करूनही महापालिकेच्या शाळांत ऍडमिशन होत नाही. एवढा खर्च महागड्या शाळेतही होत नाही.

रिलायन्स जिओ कडून 300 कोटी खोदाई शुल्क घेतले नाही. आयुक्तांनी डेव्हलपमेंट चार्जेस 124 कोटी कमी धरले. 3 इंस्टॉलमेंट देण्याची पद्धत चुकीची आहे. एक प्रोजेक्ट पूर्ण व्हायला तीन वर्षे लागतात, पंतप्रधान आवास योजनासाठी फुकट जागा मिळणार, त्यासाठी केंद्रातून चांगले अनुदान आणा, तुमच्याकडे 6 आमदार आहेत. पुणे महापालिका 10 पट खर्च करते. मग पुणे महापालिकेचे नाव का नाही देत नाही.

आपण 110 कोटी खर्च करणार, नागरिकांनी साडेसात लाख खर्चावे लागणार आहे. तो कमी करण्यात यावा. यावेळी शिंदे यांनी आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.