Hinjawadi : ‘नोकरी डॉट कॉम’च्या नावे तरुणीची 75 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरी डॉट कॉम या संकेत स्थळावरून बोलत असल्याचे सांगून नोकरीच्या नावाखाली एका तरुणीची 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे 15 ते 20 जुलै 2019 या कालावधीत घडली.

श्रेया शाहूराव भागवत (वय 28, रा. सनसिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अदिती रॉय (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै ते 20 जुलै 2019 या कालावधीमध्ये आरोपी आदिती हिने फिर्यादी श्रेया यांना फोन केला. आपण नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावरून बोलत असल्याचे खोटे सांगून श्रेया यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणांसाठी श्रेया यांच्याकडून 75 हजार 568 रूपये घेऊन फसवणूक केली. पैसे घेऊन नोकरी न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रेया यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.