Pimpri : जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बंद; आठवड्यातील दुसरी घटना

एमपीसी न्यूज – बसच्या इंजिनमधील जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बीआरटी मार्गात बंद पडली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी पाचच्या सुमारास एच ए कॉलनी स्टॉपवर घडली. बीआरटी बस बंद पडल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. 


हडपसरवरून निगडी भक्ती-शक्तीकडे जाणारी बीआरटी बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 1869) पिंपरीमधील एच ए कॉलनी बस स्टॉपवर आली असता, इंजिनमधील तांत्रिक दोषामुळे (जॉईंट तुटला) बंद पडली. दरम्यान बसमधून सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. चालक व वाहक दोघांनी मिळून प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून प्रवाशांच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था केली.

एका आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने बीआरटीच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एच ए कॉलनी बस स्टॉपवर बंद पडलेल्या बसच्या मागे कोणतेही वाहन नसल्याने याचा अन्य वाहनांवर कोणताही परिणाम झाला नाही. चालक व वाहकांनी हडपसर आणि निगडी पीएमपीएमएल बस डेपोला घटनेची खबर दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.