Juni Sangvi : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी घेतले वाहतूक नियमांचे धडे

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब रहाटणी आणि सांगवी वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक सप्ताहानिमित्त जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने 4 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत वाहतूक विभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया भोईर, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, प्रिया मेनन, भटू शिंदे, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

  • सुप्रिया भोईर यांनी विद्यार्थ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व, नियमांचे पालन न केल्यास घडणारे दुष्परिणाम आदींबाबत माहिती दिली. शिक्षिका आशा घोरपडे यांनी वाहतूक सप्ताहाबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मनिषा पुराणिक यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.