Kalewadi news: काळेवाडीतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 22 काळेवाडी येथील ज्योतिबानगर मधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्यावरील सुरु करण्यात येणा- या काँक्रीटीकरण कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज (सोमवारी) भूमिपूजन पार पडले.

महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य विनोद नढे, संतोष कोकणे, नगरसदस्या निता पाडाळे, उषा काळे, माजी नगरसदस्य प्रमोद ताम्हणकर, उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर, राजेंद्र जावळे, कनिष्ठ अभियंता संजय कांबळे आणि सामाजिक
कार्यकर्ते विलास पाडाळे, कैलास सानप, विनोद तापकीर, काळूराम नढे, अतुल नढे, विशाल नढे, पद्माकर जांभळे, अरूण बकाल, प्रकाश चिटणीस, संगिता कोकणे आदी उपस्थित होते.

ज्योतिबानगर मधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्यावरील काँक्रीटीकरणाच्या कामासाठी
सुमारे 6 कोटी 50 लाख इतका खर्च येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.