Kalewadi News : घराबाहेर काढल्याचा राग आल्याने मारहाण, तीन जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दारू पिऊन घरी आलेल्या इसमांना घराबाहेर काढल्याचा राग आल्याने 22 वर्षीय तरूणाला दांडकाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 07 नोव्हेंबर) रोजी नढेनगर, काळेवाडी येथे ही घटना घडली.

छोटु गौतम (वय 35), सोनु गौतम (वय 37) आणि रिंकु गौतम (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी यांची नावे आहेत. याप्रकरणी रामप्रकाश उमाशंकर कुमार (वय 22, रा. नढेनगर, काळेवाडी ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.19) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या घरी दारू पिऊन आले होते, त्यावरून फिर्यादी यांनी त्यांना घराबाहेर काढले. याचा राग आल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी, दांडकाने मारहाण करून जखमी केले तसेच, शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.