School Reopens : शाळेचे वर्ग पुन्हा भरविण्यास आम्ही सुसज्ज – कमला बिष्ट

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या आदेशावरून तब्बल वीस महिन्यानंतर राज्यांतील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे चिखली – मोशी येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कुलने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी चांगलीच तयारी केली आहे. एखाद्या कौटुंबिक सणाच्या उत्सवाप्रमाणे शाळेतील पालक – शिक्षक – विद्यार्थी यांची लगबग सुरू आहे.

कोरोनाचे नियम पाळत सर्व उपाय योजनांची देखील शाळेने अंमलबजावणी केली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. नुकतेच शाळेने आरोग्य शिबीर घेऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी देखील केली असून आमचे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे संचालिका कमला बिष्ट यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद होत्या. या कठीण काळातही इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कुलने ऑनलाईन पद्धतीचा सुयोग्य वापर करून अध्यापन, अध्ययन आणि मुल्यमापन यांचा ताळमेळ राखून विद्यार्थ्यांना योग्य पध्दतीने, आधुनिक उपकरणाद्वारे शिक्षण दिले.

शाळेतील वर्ग हा मनाला ताजेतवाने करणारा स्रोत आहे.शिक्षकांच्या देखरेखीखाली मुलांनी आपल्या समवयीन मुलांमध्ये एकत्र राहणे, एकमेकांशी मैत्री करणे, मैदानात एकत्र खेळणे, दंगामस्ती करणे, सामाजिक वर्तनाचे नियम, सामाजिक शिस्त आणि संबंधित सामाजिक कौशल्ये यांचा किंचितसा अभाव आढळला तो आता शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने पूर्ण होणार याचा मनस्वी आनंद व्यक्त होत आहे.

इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कुलने विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळेने केली होती. शाळेमध्ये फुग्यांची आणि फुलांची सजावट केली होती. विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटवर फित कापून प्रवेश केला. शिक्षकांनी त्यांच्यावर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून आणि त्यांना टीका लावून त्यांचे स्वागत केले.

शाळा पुन्हा सुरू होणार हा एक अवर्णनीय उत्साह त्यावेळी विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांचा तो उत्साह टिकून राहावा यासाठी शाळेने त्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडले. त्यांच्या शारीरिक कौशल्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन शाळेने त्यांना मैदानात मनसोक्त खेळू दिले.

मुले स्वतंत्र झाली व त्यांच्या हक्काचे विश्व त्यांना मिळाले असे दिसून येत होते. आज मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला व त्यांनी तो आनंद भरभरून लुटला. मित्रमैत्रिणी व शिक्षकांच्या सान्निध्यात मुले स्वतःची ओळख निर्माण करतात. याची पुरेपूर जाणीव समाजाला असली पाहिजे असे म्हणत इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कुलने विद्यार्थ्यांचे हर्षउल्हासित स्वागत करत शाळेला सुरुवात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.