Kamshet : बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

एमपीसी न्यूज – कामशेत जवळील टाकवे खुर्द गावामध्ये बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याची बातमी दोनदा लोकमत मध्ये मागील महिन्यात आली होती. यावर सर्च चालु असल्याचे वन विभागाने सांगितले असतानाच शुक्रवार (दि. 14) रोजी गावातील शाळेच्या मागच्या बाजुला असलेल्या धनगराच्या घोडीवर रात्री हल्ला करून बिबट्याने तिची शिकार केली.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले टाकवे गावाच्या उत्तरेकडे मोठा डोंगर असून या परिसरात घनदाट जंगल आहे . या भागात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जंगलामध्ये पाण्याचा वानवा आहे या भागातून पाण्याच्या शोधात बिबटे गावात आल्याचा अंदाज स्थानिक गावकरी व्यक्त करत आहे . शेतकरी उशिरापर्यंत शेतात काम करत आहे त्यातच बिबटे आढळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण झाले असतानाच एका घोडीवर हल्ला केल्याने गावातील पाळीव जनावरे किती सुरक्षित आहे हाच नेमका प्रश्न असून वन विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडण्या अगोदार सर्च ऑपरेशन करून व पिंजरा लावुन बिबट्यांना पकडावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे .

गेल्या काही दिवसांपासुन याठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी करून वन विभागाकडून दोन टीमची नियुक्ती केली गेली होती . परंतु पुढे या टीमला काहीच हातात लागले नाही व आज एका घोडीचा हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यु झाला

संजय मारणे ( वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरोता) :- प्राथमिक माहितीत हा हल्ला बिबट्यानेच केला असावा असा अंदाज आहे. घोडीला शवविच्छेदन करण्यास न पाठवता त्या ठिकाणी एक कॅमेरा लावून पुन्हा खाण्यास बिबटया येतो का ते पाहत असुन नागरिकांनी सतर्क राहावे व रात्री फिरणे टाळावे असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.