Kanpur Accident: कानपूरजवळ भीषण अपघातात 25 भाविक मृत्युमुखी

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला झालेल्या अपघातात (Kanpur Accident) 25 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नवरात्रीनिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे सर्व भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीतून कोरथा गावात परतत असताना हा (Kanpur Accident) अपघात झाला. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशमधील 50 भाविक उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना वेगात असलेला ट्रक्टर उलटला. ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या शेतात पडली. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करून दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ‘कानपूरमधील ट्रॅक्टर अपघाताच्या बातमीने दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींसाठी प्रार्थना करण्यासह  स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Chandni Chowk Bridge Blast : स्फोटानंतर पोकलेनच्या मदतीने जमीनदोस्त केला चांदणी चौकातील पूल, सकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.