Katraj news : कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने दुचाकी घसरल्या

एमपीसी न्यूज-कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने अनेक दुचाकी घसरल्याचा (Katraj news )प्रकार आज संध्याकाळी घडला.

Chinchwad News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 60 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

याबाबत माहिती देताना कात्रज अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की ,आज संध्याकाळी वाहतूक विभागाने माहिती दिली की कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने दुचाकी घसरून अनेक छोटे अपघात होत आहेत. आम्ही एका अग्निशमन बंबासमवेत तात्काळ घटनास्थळी पोहचलो. जवळच्या कचरा डेपोतून तेलकट पाणी रस्त्यावर येत होते व त्यामुळे दुचाकी घसरत होत्या.

अग्निशमन कर्मचाऱ्यांनी ( Katraj news) त्या तेलकट पाण्यावर माती टाकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.