Kaviteche Gav Ubhadanda : पुस्तकाचे पहिले गाव भिलार तर कवितेचे पहिले गाव ‘उभादांडा’

एमपीसी न्यूज – कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भारतातील पहिले कवितांचे गाव (kaviteche gav ubhadanda) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील भिलार (Bhilar) हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर आता उभादांडा हे गाव कवितेचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनप्रसंगी कवयित्री अनुपमा उजगरे (anupama ujagare), राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक शामकांत देवरे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या आणि या प्रकल्पाच्या पुस्तक निवड समितीच्या सदस्य रेखा दिघे, पोंभुर्ले येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Talawade : फ्रिजचे करंट लागून बालकामगाराचा मृत्यू , मालकावर गुन्हा दाखल

विविध कविता प्रकारांतील तसेच विविध कवींच्या कवितांची दालने या ठिकाणी उभारण्याचे प्रस्तावित असून अशी अधिकाधिक दालने होतील यासाठी चाचपणी करण्याच्या सूचना मंत्री केसरकर यांनी दिल्या.

‘मराठीतील श्रेष्ठ आणि प्रसिद्ध कवींची आणि त्यांच्या साहित्याची नवीन पिढीला ओळख व्हावी या बरोबरच साहित्य-पर्यटन या प्रकाराला चालना मिळावी, या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

भिलार येथे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव अस्तित्वात आले. याच धर्तीवर उभादांडा येथे भारतातील पहिले कवितेचे गाव साकारण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.