Nigdi News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता ग्रुप बुकिंग सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून गौरीगणपती सणाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण प्रवासी संघातर्फे एसटीच्या जादा बसचे ग्रुप बुकिंग सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी बुकिंग करण्याचे आवाहन कोकण प्रवासी संघाने केले आहे.

कोकण प्रवाशी संघामार्फत गेली 20 वर्षेपासून नियमितपणे गौरीगणपती सणाकरिता कोकणवासीयांसाठी ज्यादा एसटीच्या बसेस ग्रुप बुकिंग केले जाते. एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हे काम केले जाते. यावर्षीही कोरोनाचे नियम व अटी पाळून कोकणवासीयांसाठी ज्यादा लालपरी गाड्या सोडण्यात येणार आहेत. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, देवगड , राजापूर , गडहिंग्लज या मार्गावर गाड्या सोडण्यात येतील. 8 आणि 9 सप्टेंबर या दिवशी दिवशी गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणवासीयांनी बुकिंग करुन या सवलीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बुकिंगसाठी संपर्क – सिद्धिविनायक गणेश मंदिर, निगडी बस स्टॉपजवळ, पवळे उड्डाणपुलाजवळ, निगडी पुणे, जयेश भुवड 88884 30438 / 86054 27680,
मिथुन 91752 62254, प्रकाश 79729 80891 आणि राणे 90285 52237 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.