Khadki Crime: खडकी बाजार येथे मटका अड्ड्यावर छापा टाकत दहा जणांना अटक

एमपीसी न्यूज : खडकी बाजार येथे छापा टाकत पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.(Khadki Crime) ही कारवाई शनिवारी (दि.27) पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी केली.

खडकी बाजार येथील मेहता बिल्डींग जवळील रस्त्याच्या कोपऱ्यात बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार जुगार अड्ड्यावर छापा मारत जुगार खेळणाऱ्या दहा जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्या जवळून 49 हजार 950 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.(Khadki Crime) आरोपींना खडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याअतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Road work: रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नगर रोड ते थेऊर फाटा रोडवर जड वाहनांना बंदी

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, अजय राणे, पुष्पेंद्र चव्हाण,(Khadki Crime) संदिप काळे, अमित जमदाडे व महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.