Khandala Accident : खंडाळा बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रेलर पलटला

एमपीसी न्यूज –  खंडाळा बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रेलर पलटला (Khandala Accident) होता. आज (बुधवार) सकाळी 11.15 च्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात  दोन जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Akurdi : खंडोबा माळ ते बर्ड व्हॅली चौकापर्यंत रस्ता दुरुस्त करुन सुशोभीकरण करा

या अपघातामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग, लोणावळा शहर पोलीस, देवदूत आपत्कालीन पथक आणि आयआरबीचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांना सुद्धा घटनास्थळी जाताना अमृतांजन पुलापर्यत जाऊन उलट्या दिशेने जावे लागले होते.या सर्वांनी मिळून अपघात स्थळ मोकळे करण्यासाठी  प्रयत्न  केले व लेनवर पलटलेला ट्रेलर बाजूला केला.

पलटलेल्या ट्रेलर बाजूला करेपर्यंत वाहतूक अधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक  लोणावळ्यातील वलवण येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाकडे वळवली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.