Talawade : दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात, घरातून लॅपटॉपसह इतर साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – दरवाजा उघडा ठेवून झोपणे तरुणाला ( Talawade) उघडा ठेवणे पडले महागात. कारण चोरांनी रूममधील लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेले आहे. ही घटना सोमवारी (दि.31) तळवडे येथे घडली आहे.

Khandala Accident : खंडाळा बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रेलर पलटला

याप्रकरणी समिर ज्ञानेश्वर कदम (वय 30 रा.तळवडे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रुमचा दरवाजा उघडा ठेवून झोपी गेले.

यावेळी चोराने घरात प्रवेश करत घरातून 3 लॅपटॉप, चांदीच्या अंगठ्या, रेनकोट असे एकूण 64 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.

देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Talawade) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.