Pune News : पुण्यातील हडपसर जवळ असलेल्या किर्लोस्कर ब्रिजवर पहाटे भीषण अपघात

एमपीसी न्यूज : पुण्यातील हडपसर जवळ असलेल्या किर्लोस्कर ब्रिजवर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. बीआरटी मार्गावर असलेल्या रस्त्यावर (Pune News) खाजगी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात पीएमपीएल बसला धडक दिली.या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.

PCMC New : जॅकवेल निविदेतील 30 कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणखी पेटणार; लेखापरीक्षकांनी हात झटकले !

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील हडपसर स्वारगेट बीआरटी मार्गात पीएमपीएल बसला खासगी ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ही घटना आज सकाळी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये पीएमपीएल बस चालक सुनील रामचंद्र कोलते यांच्या पोटात स्टेअरिंगचा रॉड घुसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तर कंडक्टर संदीप उत्तम जराड हे सुद्धा जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहेत.

या दोन्ही बस एकमेकांना समोरून धडकल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.(Pune News) शनिवारी पहाटे 4.45 च्या सुमारास हा अपघात झाल्याचा माहिती आहे. घटनास्थळी वानवडी पोलीस पोहचले असून रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. तर खासगी बस चालक युसुफ शेख हा गंभीर जखमी असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस आणि ट्रॅव्हल्स जोरदार अपघात झाल्याने दोन्ही वाहनांमधील प्रवाशांना किरकोळ मार लागलेला आहे.

ही बस सोलापूर हुन मुंबईच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स पुण्याहून हडपसरच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बस वर आदळली. वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रामटेकडीत हा अपघात झाला आहे. दोन्ही बस कन्ट्रोल झाल्या नसल्याने त्यांची समोरासमोर टक्कर झाली,(Pune News) अशी प्राथमिक माहिती आहे.घटनास्थळावर वानवडी पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाहतूक थांबून मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.पीएमपीएल ही रातराणी बस होती. यामध्ये 5 ते 6 प्रवासी प्रवास करत होते. खासगी बसच्या प्रवाशांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हर सोबत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.