Khed Crime News : मजुराला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून मजुराला (Khed Crime News) दमदाटी करत चाकुचा धाक दाखवून लुटले आहे. ही घटना सांगुर्डी फाटा, खेड येथे रविवारी (दि.12) रात्री घडली.

 

 

याप्रकरणी मंगेश खंडू गडगिळे (वय 24 रा. देहुगाव) यांनी फिर्याद दिली असून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बाळासाहेब उर्फ बाळू हनुमंत ढोरे (रा. इंदुरी) याला अटक केली आहे.

 

Pune News : पत्नीने घटस्पोट मागितला म्हणून त्याने जाळल्या गाड्या

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना आरोपीच्या दुचाकीला गाडी घासली असता आरोपीच्या गाडीचा आरसा तुटला. यावरून आरोपीने फिर्यादीला नुकसान भरपाई मागितली. याला फिर्यादीने नकार दिला असता यावरून चिडून आरोपीने चाकुचा धाक दाखवून फिर्यादी कडून 4 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावरून (Khed Crime News) हाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.