Pune News : पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून त्याने जाळल्या गाड्या

एमपीसी न्यूज – शक्यतो पती पत्नीच्या भांडणात पडू नये त्याने आपलेच नुकसान होते (Pune News) असे म्हणतात, पण पुण्यात भांडणात न पडताही अनकांचे मोठे नुकसान झाले आहे. कारण पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून चिडलेल्या पतीने थेट गाड्या पेटवल्याची धक्कादायक कोंढवा भागात घडली आहे. हा सगळा प्रकार सोमवारी (दि.13) पहाटे 5 वाजता घडला.

 

 

टेरेन्स डॉमिनिक जॉन असे या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पत्नी सोबत राहायचे असल्यामुळे त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट देऊ नको असे सांगितले तरी सुद्धा त्याच्या पत्नीने अर्ज दाखल केला. घटस्फोटाच्या अर्जावरून चिडलेल्या जॉन ने पत्नीची दुचाकी जाळायचे ठरवले.

 

Sangvi Crime News : मेफेड्रोनसह नायजेरीयन तरुणाला अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

 

 

यावेळी पार्किंग मध्ये असलेल्या इतर दुचाकिंसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि इतर (Pune News) दुचाकी यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. पोलिसांनी टेरेन्स ला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.