Sangvi Crime News : मेफेड्रोनसह नायजेरीयन तरुणाला अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi Crime News) हद्दीतील डि मार्ट जवळ मेफेड्रोन (एम.डी.) विक्रीसाठी आलेल्या नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि.13) केली आहे.

बनकोले युसुफ ओओलाबी (BANKOLE YUSUF OWOLABI)( वय 24 वर्षे रा. मोरया पार्क सांगवी पुणे व मुळ – ओशीडी लोगोस देश नायजेरिया) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रदीप शेलार व संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाले की सांगावी पोलीस स्टेशन चे हद्दीत रहाणारे नायाझेरियन इसम हे अंमली पादर्थ ची विक्री करण्यासाठी डी मार्ट जवळ येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.

 

 

Pimpri News : ‘पीसीइटी इन्फिनिटी 90.4 एफएम’ आणि ‘आरोग्यमित्र फाउंडेशन आयोजित’ जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात

 

बातमीनुसार एक संशयीत नायजेरीयन तरुण दुचाकीवरून आला पण तो पोलिसांना पाहताच पळून जात असताना पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कडे असलेल्या काळ्या रंगाचियी पाउचमध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून 17 ग्रॅम वजनाचे 68 हजार रुपयांचे एमडी हा अंमली पदार्थ व 60 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 1 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार , पोलीस उपनिरीक्षक राजन (Sangvi Crime News) महाडीक ,पोलिस अंमलदार प्रदीप शेलार,संदीप पाटील,मितेश यादव,अशोक गारगोटे, सदानंद रुद्राक्ष,संतोष भालेराव,बाळा साहेब सूर्यवंशी,पांडुरंग फुंदे यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.