Khed : वाडा येथील पिंगटवाडी येथे सिलेंडरचा स्फोट; दोन घरे जळून खाक

एमपीसी न्यूज : वाडा (ता.खेड) येथील पिंगटवाडी (Khed) येथे दत्ता धर्माजी पिंगट यांच्या राहत्या घरी सांयकाळी गॅसच्या शेगडीने अचानक पेट घेतल्याने गॅसचा स्फोट झाला असून त्यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, त्यांच्या जीवनावश्यक वस्तूची होळी झाली. 

दत्ता पिंगट यांच्या घरी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास गॅसच्या शेगडीने अचानक पेट घेतला. त्यांनी यंग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याने आग आटोक्यात आली नसून त्यांनी त्वरित घरातील माणसांना सुरक्षित बाहेर काढले.

तो पर्यंत गॅसचा स्पोट होऊन घराला मोठ्या प्रमाणात आगीने वेढले होते व घर कौलारू असल्याने आगीने तात्काळ पेट घेतला.  ही आग घरा शेजारी राहणाऱ्या जीनसु नाना पिंगट यांच्या घरापर्यंतही पोहचली. त्यांनी तत्काळ मदतीसाठी स्थानिक माणसांना  बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये दत्ता यांच्या घराची अक्षरशः राख झाली असून शेजारी राहणाऱ्या जिनसु पिंगट यांचेही घर जळाले. त्यात त्यांचे धान्य, कपडे अन्य जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

Chakan : मातीच्या ढिगाऱ्यात अडकून दोन मजुरांचा जागीच मृत्यू

घटना घडल्यानंतर २ तासाने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी (Khed) दाखल झाली असून तोपर्यंत स्थानिक आशिष पिंगट, संतोष पिंगट, बाळशिराम पिंगट, दत्ता पिंगट, बाळू पिंगट, सुदाम पिंगट, राम बोऱ्हाडे, लक्ष्मण पिंगट. लहू शेटे, लक्ष्मण घनवट व इतर ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

ही घटना समजताच घटनास्थळी शिवाजी मोरे, आपत्ती व्यवस्थापनचे दीपक पावडे, अक्षय केदारी, तेजस लांडगे, संतोष हुंडारे, रघुनाथ लांडगे यांनी धाव घेत संबंधित ठिकाणी योग्य ती मदत पुरवली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा दुध संघाचे अरुण चांभारे, अध्यक्ष खरेदी विक्री संघ राजाराम लोखंडे यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबाचे सात्वन करत तातडीची मदत दिली. घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस जवान निखील मोरमारे यांनी येऊन पहाणी करून पंचनामा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.