Khed: सिमेंट पाईपच्या कारखान्यातून सव्वा दोन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – सिमेंटचे पाईप बनविण्याच्या कारखान्यातून अज्ञात (Khed)चोरट्यांनी दोन लाख 28 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 जानेवारी रोजी खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात घडली.
ईश्वर अंकुश गीते (वय 38, रा. चिखली) यांनी याप्रकरणी (Khed)महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्यात हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुरकुंडी गावात सिमेंट पाईप बनविण्याचा कारखाना आहे. कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 28 हजार रुपये किमतीच्या सिमेंट पाईप बनवण्याच्या साच्याच्या 19 रिंगा चोरून नेल्या. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.