Maharashrta : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

एमपीसी न्यूज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि (Maharashrta )माजी प्रांत सह प्रचार प्रमुख विश्वास ताम्हणकर यांचे दीर्घ आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांचे वय 77 वर्षे होते. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे पार्थिव मोतीबाग संघ कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

Pimpri : जरांगे पाटील यांची पदयात्रा 24 जानेवारीला पिंपरी चिंचवड शहरात

ताम्हणकर यांचा जन्म 1948 मध्ये पुण्यात झाला.(Maharashrta) त्यांनी अभियांत्रिकी पदविकाचे शिक्षण घेतले होते. काही वर्षे नोकरी केल्यानंतर 1971 पासून प्रचारक म्हणून ते कार्य करू लागले. परभणी जिल्ह्यात प्रचारक म्हणून काम करताना आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून त्यांनी संघर्ष केला.

त्यानंतर 1977 पासून 1998 पर्यंत त्यांनी पुन्हा नोकरी केली व 1998 पासून अखेरपर्यंत प्रचारक राहिले. महाराष्ट्रातील ऑडियो व्हिज्युअल अर्काईव्ह करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. प्रांताचे सह प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच 2002 पासून ते ‘सांस्कृतिक वार्तापत्र’ या नियतकालिकाची जबाबदारी सांभाळत होते. इस्लाम तसेच उर्दू व फारसी यांचे ते जाणकार होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.