Maharashtra News : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नाट्य समीक्षक ,लेखक व दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे (Maharashtra News) मुंबईत निधन झाले आहे. काल ( दि.11)रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती.आज (दि.12 ) सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत शेकडो नाटकांवर लिखाण केले आहे.नाट्यसमीक्षेसह  सुरुवातीच्या वर्षांमध्ये सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत पंधरा वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून ते कार्यरत होते.लोकप्रभा’ या साप्ताहिकात देखील ते नाट्यसमीक्षा लिहीत असत.

 

Pune News : शंकर महाराज ट्रस्टला ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे कार्डीॲक रुग्णवाहिका भेट

नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक ही पुस्तके लिहिली आहेत.नाट्य संहिता वाचून, तिच्यातले बारकावे काढून, प्रयोगाच्या मर्यादा दाखवत ते नाट्यसमीक्षा लिहायचे. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. 2019 मध्ये अखिल भारतीय नाट्यपरिषदेने त्यांना (Maharashtra News) जीवनगौरव सन्मान प्रदान केला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.